हस्तांतरण

हस्तांतरण - DOWNLOAD

                हस्तांतरण म्हणजे घर , दुकान घरातील व्यक्तींच्या नावे करावयाचे त्यास हस्तांतरण म्हणतात, हस्तांतरण करण्याचे दोन प्रकार आहेत ते खलील प्रमाणे 

१ - ज्या व्यक्तीच्या नावे घर, दुकान आहे ती व्यक्ती हयात ( जिवंत ) असेल तर

२ - ज्या व्यक्तीच्या नावे घर, दुकान आहे ती व्यक्ती मृत्यू पावली असेल तर

                प्रथम उदा १ या या प्रकारातील घर घरातील / कुटुंबातील  इतर व्यक्तींच्या नावे बदलून / करुण घेणेची पद्धत पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता hअसते ते खलील प्रमाणे -

१ - विवरण पत्र/तसेच हस्तांतरण झाले असल्यास सर्व बदलांवर मुद्रांक शुल्क भरल्याच्या पावतीची प्रत -   येथे ज्या व्यक्तीच्या नावे सध्या घर आहे त्या व्यक्तिला म्हाडा कडून देण्यात आलेले अलॉटमेंट पत्र व त्या व्यक्तीने जर स्टॅम्प ड्यूटि भरलेलेची झेरॉक्स प्रत अपलोड करावी

२ - स्वत:च्या छायाचित्राच्या पासपोर्ट आकाराच्या दोन प्रमाणित प्रती (हस्तांतरण अर्जासोबत विहित नमुन्यातील)  - याचा नमूना अर्जसोबत शेवटच्या पानावर उपलब्ध आहे त्याची प्रिंट घेऊन त्यावर ज्याचे नावे घर करावयाचे आहे त्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन एस ई ओ , GAZETTED OFFICE, नगरसेवक या पैकी कोनाकडूनही फोटो अटेस्टेड करुण घ्यावेत

३ - अनधिकृत बांधकाम व संस्था पंजिकृत नाही इत्यादी बाबतचे विहित नमुन्यातील रु.१०० चे न्यायालयीन प्रतिज्ञापत्र  - वरिल DOWNLOAडी  या लिंक वर क्लिक केल्या नंतर आपणास अर्जचा नमुना, AFFIDAVIT & INDEMNITY BOND चे नमुने ( FORMAT ) उपलब्ध होतील त्यातील पेज नंबर - ४ वरील नमुना AFFIDAVIT ज्याच्या खाली TO BE EXECUTED BY PROPOSED TRANSFERY असे लिहले आहे तो अपलोड करावा

४ - मूळ गाळेधारक ह्यात नसल्यास व मूळ गाळेधारकाने त्याचे संबंधीत सदनिका / भूखंड बाबत मृत्युपत्र केले असल्यास, त्याच्या मृत्यूदाखल्याची प्रमाणित प्रत व नोंदणीकृत प्रमाणपत्राची प्रत. मृत्युपत्रातील नमूद वारासांपैकी कोणत्याही एका वा काही वारसांचे नाव भोगवटा बद्दलची मागणी असल्यास इतर सर्व वारसांचे ज्या वारसांचे नावे भोग्वाताबदल करायचे आहे अशा वारसाचे नावे नोंदणीकृत हक्कसोड पत्र. / मूळ गाळेधारक हयात नसल्यास त्याच्या पत्नीच्या नावे सदनिका / भूखंड भोगवटा बदलची मागणी असल्यास इतर वारसांचे विहित नमुन्यातील रु १०० चे न्यायालयीन ना-हरकत प्रमाणपत्र  - येथे घर ज्याचे नावे आहे त्याने जय REGISTER WILL केलेली असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी ट्रू कॉपी करुण अपलोड करावी किंवा जर घर त्याच्या पती किंवा पत्नीच्या नावे करावयाचे असेल तर इतर वारस जसे मृत व्यक्तीची मुलगे व मुली यांचे रुपए १०० च्या स्टॅम्प पेपर वर ते घर आईच्या / वडिलांच्या नावे करण्याबाबत ना-हरकत पत्र, त्याचा नमुना वरील डाउनलोड या वर लिंक वरील पेज नंबर ९ वर उपलब्ध आहें

५ - म्हाडा ने विहित केलेले अर्जदाराचे रु २००/- चे स्टॅम्प पेपरवरील क्षतीपुर्तीबंधपत्र - येथे घर ज्या व्यक्तीच्या नावे करावयाचे आहे त्याचे indemnity bond रु - २०० च्या बॉन्ड पेपर वर रजिस्टर नोटरी करून घ्यावा आणि जर घर बक्षिस पत्राच्या आधारे हस्तांतरित करीत असाल तर ज्याच्या नावे घर आहे त्याचे ही indemnity bond बनवून घ्यावा त्याचा नमूना अर्जात उपलब्ध आहे

६ -  म्हाडाने विहित केलेल्या नमुन्यातील सहकारी संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र - सोसाइटी चे ना - हकरत प्रमाणपत्र घ्यावे 

७ - मूळ गाळेधारक ह्यात नसल्यास व मूळ गाळेधारकाने कोणतेही नोंदणीकृत मृत्युपत्र केलेले नसल्यास, मे. न्यायालयाने दिलेले वारसपत्रकाची प्रत. - ज्याच्या नावे घर आहे टी व्यक्ती जर मृत्यु पावली असेल तर जर त्याच्या पत्नी सोडून इतर मुलांच्या किंवा मुलींच्या नावे घर करावयाचे आसेल तर मा उच्च न्यायालयाचे LETTER OF ADMINISTRATION किंवा HEIRSHIP CERTIFICATE काढावे व ते येथे अपलोड करावे 



८ - अर्जदार ह्यात नसल्यास मृत्युदाखाल्याची प्रत / अर्जदार ह्यात असल्यास बक्शीसपत्राची प्रत


९ - संपूर्ण थकबाकी म्हाडाला भरणा केलेल्या पावत्या व चालू महिन्याची पावतीची प्रमाणित प्रती(भुईभाडे व अकृषिक आकार इ. सह)- येथे जर भाड़े आपण म्हाडा ला भरत असल तर त्याची प्रत स्कैन करुण टाकावी किंवा जर सोसाइटी भाड़े भरत असेल तर सोसाइटी म्हाडा ला भाड़े भरत असेल त्याचे XEROX कॉपी स्कैन करुण अपलोड करावी 

१० - कुटुंबाच्या छायाचित्राची प्रत- फैमिली फोटो स्कैन करुण अपलोड करावा 


११ - मे. न्यायालयाने दिलेले वारसपत्रकातील नमूद वारासांपैकी कोणत्याही एका वा काही वारसांचे नाव. भोगवटा बद्दलची मागणी असल्यास इतर सर्व वारसांचे ज्या वारसांचे नावे भोग्वाताबदल करायचे आहे अशा वारसाचे नावे नोंदणीकृत हक्कसोड पत्रक - 


No comments:

Post a Comment